शिवाजी कर्डिले, संग्राम जगताप यांच्यासह आजी-माजी आमदार-नगरसेवकांचे शस्त्र परवाने निलंबित

0
847

अहमदनगर, दि. ९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अहमदनगरमधील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहेत.  अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा निर्णय घेतला.  

लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या सहा जणांचे शस्त्र परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी   शस्त्र परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप,  शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सचिन जाधव यांचाही शस्त्र परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केला आहे.

दरम्यान, केडगाव पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी  भाजप आमदार शिवाजी कर्डीले आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.