नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले चिंचवडचे एपीआय योगेश गुजर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

0
1173

 चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले धडाकेबाज पोलीस निरीक्षक  चिंचवड, दळवीनगर येथील योगेश गुजर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने गडचिरोली येथे शुक्रवारी (दि.८) पहाटे  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील असा परिवार आहे. त्यांचा दोन वर्षापूर्वीच थेरगांव येथे विवाह झाला होता. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  

योगेश गुजर हे चिंचवड दळवीनगर येथील रहिवासी असून २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्र पोलीस  दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. त्यांची पहिली नियुक्ती नक्षलवादी प्रभावित असलेल्या  गडचिरोली जिल्ह्यात झाली होती. योगेश गुजर यांनी वेगवेगळ्या कारवायामध्ये  सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. या कामगिरीबद्दल त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली होती.

योगेश यांच्या पार्थिवावर चिंचवड, लिंकरोड येथील स्माशनभूमीत आज (शनिवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, गडचिरोली पोलीस अधिकारी आदी उपसिथित होते.