वाकड येथे आदिवासी मुला- मुलींच्या वसतिगृह इमारतीचे आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते भूमिपूजन  

0
866

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – वाकड, पोलीस लाईन येथे आदिवासी मुला- मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या कामाचे भूमिपूजन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

याप्रसंगी पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष  सदाशिव खाडे,  माजी  स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड,   नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, नगरसेविका उषाताई मुंढे ,आरती चोंधे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

वाकड येथील आदिवासी मुला- मुलींच्या वसतिगृहासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आदिवासी मंत्री  विष्णू सावरा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने या कामासाठी निधी मंजूर केला असून आदिवासी वसतीगृहाचे इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासंदर्भात  पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. वाकड येथील पेठ क्रमांक ४०  हा भूखंड वसतिगृहासाठी आरक्षित करण्यात आला आहे .

या वसतीगृहामुळे राज्यातील अनेक आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.    तसेच त्यांची शहरात शिक्षण घेण्याची सोय होणार आहे.  अनेक हुशार, होतकरू आदिवासी विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र, राहण्याची सोय नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या वसतीगृहामुळे त्यांच्या राहण्याची अडचण दूर होणार असून अनेक आदिवासी मुला-मुलींना या वसतिगृहाचा लाभ होणार आहे.