शिवसैनिकांनो औकातीत राहा; निलेश राणेंचा इशारा

0
456

मुंबई, दि. १६ (पीसीबी) –  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार  नीलेश राणे यांचे पुतळे जाळले होते. यावर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांना ‘औकातीत राहा’, असा इशाराच दिला आहे.

मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल. गल्लीतल्या कुत्र्यांसारखे काही शिवसैनिकानी माझे दोन तीन ठिकाणी पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा. परत सांगतो अवकातीत रहा ठाकरेंची अब्रू वाचवा, अशा शब्दांत ट्विट करून राणे यांनी शिवसैनिकांना इशारा दिला.