शिवसेनेसोबत युतीसाठी नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन; दिल्लीत हालचालींना वेग

0
1639

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीबाबत वाढता तणाव कमी करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यात पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ते येत्या २३ जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून युतीचा महामार्ग बांधण्याचे प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून आधीच करण्यात आली आहे. शिवसेनेची मागणी पूर्ण केल्यास दोन्ही पक्षांतील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी हातभार लागू शकतो, अशी अटकळ भाजपने बांधली आहे.