शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मानधनाचे पाच लाख दिले मुख्यमंत्री सहाय निधीसाठी

0
267

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) : कोरोना विरोधातील लढ्यासाठी मदत करण्यास नगरसेवक सरसावले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक राहुल कलाटे यांनी गेल्या चार वर्षांतील ५ लाख १५ हजार १०० रूपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायत्ता निधीस दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौºयांवर असताना कलाटे यांनी पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

कोरोनाचा विळखा वाढत असताना विविध सेवाभावी संस्था, उद्योजक असे विविध घटकातील नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ लागल्यानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे नागरिकांच्या मदतीसाठी धावुन आले. गरीब, कष्टकºयांसाठी अन्नदान करण्याबरोबरच, समाजातील विविध घटकातील नागरिकांना अन्नधान कीट वाटप करणे, शहरात अडकलेल्या आणि परगावी जाणाºया बाहेरच्या गावाहून शहरात येण्यासाठी नागरिकांना मदत करण्याचे काम कलाटे यांनी केले आहे. त्याचबरोबर कोरानाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागल्यानंतर परिसरात धुरीकरण, नागरिकांना तसेच कोरोनायोद्धे असणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टरांना सॅनिटायजर, मास्कची कीट वाटप केले. तसेच कोरोनाबाधितांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.

कोल्हापूर सांगली सातारा परिसरात पूर आल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांनी मानधन दिले होते. त्यावेळी १५ हजार १०० रूपयांचे मानधन कलाटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दिले होते. त्यानंतर आता कोरोना महामारीचा विळखा वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत गेल्या चार वर्षांतील नगरसेवकांना मिळणारे मानधन एकुण पाच लाखाचा धनादेश ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘कोरोनाचा विळखा वाढत असताना कोरानायोद्ध्यांचे मनोबल वाढविण्याबरोबर, शहरपातळीवर सामाजिक भावनेने मदत करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक भान आणि जाणिवेच्या दृष्टीने मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार गेल्या चार वर्षांच्या काळातील एकुण पाच लाख मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.’’