शाहीन बागचा ‘जालियनवाला बाग’ होऊ शकतो – असदुद्दीन ओवेसी

0
329

नवी दिल्ली,दि.६(पीसीबी) – दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या ५० दिवसांपासून सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात (सीएए) महिलांचे धरणे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ८ फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा जालियनावाला बाग होऊ शकतो, असा संशय एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला आहे.एएनआयशी बोलताना बुधवारी ओवेसी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

८ फेब्रुवारीनंतर शाहीन बाग येथील आंदोलकांना हटवण्यात येईल, असे संकेत केंद्र सरकारकडून मिळत आहेत. याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारणा आली. यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले, “कदाचित इथल्या आंदोलकांवर सरकार गोळीबार करेल. अशा प्रकारे ते शाहीन बागचे रुपांतर जालियनवाला बागमध्ये करतील. हे घडू शकतं, कारण भाजपाच्या मंत्र्याने गोळ्या झाडा असं म्हटलंच आहे.”

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) यावर बोलताना ओवेसी म्हणाले, “सरकारने स्पष्टपणे याचं उत्तर द्यायला हवं की, २०२४ पर्यंत आम्ही एनआरसीची अंमलबजावणी करणार नाही.”

दरम्यान, “मी इतिहासाचा विद्यार्थ्यी असल्याने मला असं वाटतं की, ज्या प्रमाणे हिटलरने त्याच्या देशात दोनदा जणगणना केली होती. त्यानंतर त्यानं ज्यू लोकांना गॅस चेंबरमध्ये डांबल होतं. आपल्या देशानंही याच मार्गावर जाव असं मला वाटत नाही” असंही ओवेसी यावेळी म्हणाले.