शहर ‘गुन्हेगार मुक्ती’च्या दिशेने मोठे पाऊल; ‘या’ नामचीन गुन्हेगारांची तडीपारी

0
503

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एकमधून तब्बल 13 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील एका आठवड्यात आणखी काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील अजय अश्रुवा दुनधय (वय 24, रा. रमाई कमानीजयळ, बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी), शुभम बाळु खरात (वय 23, रा. गणेश प्रोव्हिजन स्टोअर्स मागे, संजय गांधी नगर, मोशी), जावेद लालासाहब नदाफ (वय 21, रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, भोसरी), सलमान खाजा काझी (वय 20, रा. संघर्ष कॉलनी कल्याणनगर, आदर्शनगर, मोशी), आळंदी पोलीस स्टेशन मधील आदेश भानुदास पाटोळे (वय 20, रा. सोळु, ता खेड, जि पुणे), शुभम एकनाथ जैद (वय 23, रा. जैदू वस्ती, चिंबळी, ता खेड, जि पुणे), महेश संजय शिंदे (वय 24, रा. रासे गावठाण, ता.खेड, जि पुणे), चाकण पोलीस स्टेशन मधील ओंकार मनोज बिसनारे (वय 21, रा. पोस्ट ऑफीसचे मागे, चाकण, ता.खेड, जि.पुणे), स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिदे (वय 28, रा. रासे गावठाण ता खेड, जि पुणे), महेश संजय शिंदे (वय 24, रा. रासे गावठाण, ता. खेड, जि पुणे), भोसरी पोलीस स्टेशन मधील स्वप्निल उर्फ सपन्या सुरेश भोई (वय 19, रा. शंकर काची चाळ वॉर्ड नबर 03, दापोडी, पुणे), संतोष सुखदेव माने (वय 23, रा. मयुर मेडीकल समोर, चक्रपाणी वसाहत मोसरी, पुणे), निगडी पोलीस स्टेशन मधील शांताराम उर्फ टोग्या उर्फ पप्पु रामचंद्र कांबळे (वय 32, रा. इंदिरानगर, ए-4/5 ओटास्किम, निगडी, पुणे) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुन्हेगारांना 22 जानेवारी पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. सन 2021 मध्ये मोक्का अंतर्गत पाच गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात अली असून एमपीडीए अंतर्गत दोन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, राम जाधव आणि सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केली आहे.