शहरातील विकासकामांच्या नावात होणार बदल

0
241

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – नवीन लेखाशीर्ष तयार करणे, विकासकामाचे स्थळबदल करणे, विकासकामाच्या नावात बदल करणे आदी विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

ब प्रभागामध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असून अनुषंगिक विद्युत व स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. याकामी १ कोटी २१ लाख खर्च होणार आहे. देहू आळंदी रस्त्याच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रोहित्रसंच व खांब हलविण्यात येणार आहे. याकामी १ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२- २३ करीता पिंपळे गुरव टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र, एल्प्रो पाण्याची टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र तसेच दत्तनगर जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचालन करण्यासाठी मजूर पुरविण्याकामी १ कोटी २० लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्र.३ येथील विविध ठिकाणी महापालिकेच्या इमारतींची आणि शाळांची सुधारणा करण्यात येणार आहे. याकामी ४८ लाख रुपये खर्च होतील. प्रभाग क्र. ७ मधील भोसरी येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी येणाऱ्या ४९ लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.