शरद पवारांच्याकडे शिकण्यासारखे खूप काही आहे – आदित्य ठाकरे  

0
478

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेत कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ दिले. याचे शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. शरद पवारांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

धारावीतील रोड शो मध्ये ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कधीही कोणत्याही माणसाला कमी लेखून चालत नाही.  साताऱ्यातील  प्रचारसभा शरद पवार यांनी ज्या उत्साहाने गाजवली. त्या उत्साहाचे कौतुक करावे, तेवढं थोडे आहे,

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज रोड शो करुन पुन्हा एकदा मतदानाचे आव्हान केले.   पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा यानेही शिवसेनेत प्रवेश केला. शेराही आदित्य ठाकरेंसोबत होता. त्यानेही आदित्य ठाकरेंचे कौतुक केले.