स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन दलालांवर कारवाई; चार महिलांची सुटका

0
242

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल येथील एक तर महाराष्ट्रातील तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. 1) भूमकर चौक, वाकड येथे करण्यात आली.

स्पा मॅनेजर ऋषिकेश मुकेश निकाळजे (वय 24, सध्या रा. किवळे गाव, पुणे. मूळ रा. मिलिंदनगर, अहमदनगर), स्पा चालक-मालक गणेश राजाराम घेवडे (वय 35, रा. महाळुंगे, ता. खेड पुणे), स्पा चालक-मालक रितेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौक वाकड येथे द वेदा स्पा येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली .त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. स्पा मॅनेजर ऋषिकेश निकाळजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी चार महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या कारवाईमध्ये पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एक आणि महाराष्ट्रातील तीन महिलांची सुटका केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, प्रशांत महाले, पोलीस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, राजाराम सराटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने, पूनम आल्हाट यांनी केली आहे.