वीजबिल थकल्याच्या बहाण्याने ९५ हजारांची फसवणूक

0
214

बावधन, दि. १७ (पीसीबी) – एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून फोनवरील व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीस त्यांचे वीजबिल थकले असल्याचे सांगितले. वृद्धास मोबाईलवर एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याआधारे ९५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १६) सकाळी रामनगर कॉलनी, बावधन येथे घडली.

सुहास रामचंद्र गगनग्रास (वय ६३, रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार यादव नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. तो एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांचे वीजबिल थकले आहे. रात्री साडेनऊ पर्यंत वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगून फिर्यादीस एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून ९५ हजार ७०० रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.