विधानसभेसाठी जानकरांची ५२ जागांची भाजपकडे मागणी

0
529

मुबंई, दि. १ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपकडे ५२ जागांची यादी पाठवून मागणी केली आहे. त्यापैकी निम्म्या तरी मिळतील, ही अपेक्षा असून याबाबत लवकरच भाजपच्या नेत्यांबरोबर बोलणी सुरू होणार असल्याचे समजते आहे.  

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून रासप भाजपसोबत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिर्डी येथे पार पडली. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १०० जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्‍चित केले. मागील वेळेस विधानसभेच्या भूम-परांडा, दौंड, माण-खटाव, कळमनुरी आणि गंगाखेड या पाच जागा लढवल्या होत्या. त्यात दौडची जागा राहुल कुल यांनी जिंकली होती.

येत्या २५ ऑगस्ट रोजी पक्षाचा स्थापना दिन मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कवर होणार आहे. रासपची राज्यात सध्या १२ जिल्हयात स्वतंत्र कार्यालये असून लवकरच सर्व जिल्हयात उभारली जाणार आहेत. रासपही सोशल मिडीयाचा वापर करणार असून त्यासाठी प्रशिक्षित पुर्णवेळ कार्यकर्ते पक्षाचे काम करणार आहेत.