त्यामुळे मी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले

0
792

सातारा, दि. १ (पीसीबी) – माझ्या मतदार संघातील कुरघुड्यांबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांना समोर घेऊन वाद मिटवतो. असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील भेटीत दिले होते. परंतु पवारांनी सांगूनही ह्या कुरघुड्या थांबणाऱ्या नव्हत्या. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. अशी माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सत्तेशिवाय राहता येत नसल्याने शिवेंद्रराजेंसह इतर आमदार भाजपमध्ये गेले. असे मत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. पवार यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी शिवेंद्रराजेंनी यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

शिवेंद्रराजे म्हणाले की, पक्षात कुरघुड्या करणारे आणि कामात अडथळा आणणाऱ्यांचा मी काट्याने काटा काढणार आहे.  प्रतिस्पर्धी राजघराण्यातला असो वा दुसरा कोणी मी माझ्या पद्धतीने लढणार.