“मातोश्रीवरुन मला २५ वेळा फोन आला”, विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

0
563

मुंबई, दि. १ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रवेश केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मला उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवरुन तब्बल २५ वेळा फोन आल्याचे सांगत विजय वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचे सांगितले.

विजय वडेट्टीवार चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “शिवसेनेकडून मला पक्षांतरांसाठी वारंवार फोन येत आहेत. आधीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले आहेत. त्यामुळे दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे. यासाठी मला मातोश्रीवरुन २५ फोन आले. मात्र मी तो उचलला नाही”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.