वर्च्युअल शाळा उघडल्या, ई-शिक्षणाचा श्रीगणेशा

0
467

मुंबई,दि.१५(पीसीबी) – महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर्तास तरी शाळा ऑनलाईनच उघडण्यात आल्या आहेत. काही बोर्डाच्या शाळा आधीच उघडल्या असल्या तरी महाराष्ट्रात एसएससीच्या शाळा आज ऑनलाईन सुरु झाल्या आहेत.

ई-स्कूलमुळे विद्यार्थांना शारीरिक ताण येण्याची शक्यता व्यक्त करत काही पालक आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता, मात्र कुठल्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, ही भूमिका घेत राज्य सरकारने शाळांचे टाळे ऑनलाईन उघडले.

शाळेच्या पहिल्या दिवशी पालक दाराशी सोडायला आल्यानंतर रडारड करणारे चिमुरडे यंदा दिसणार नाहीत. अनेक शाळांमध्ये ‘झूम’ किंवा ‘गुगल मीट’सारख्या डिजिटल माध्यमातून वर्ग सुरु झाले आहेत.