“उपवास, नवस-पायी वाऱ्या करु नका; एकमेकांची काळजी घ्यावी. हेच माझ्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थनांचं काम करतील”

0
315

महाराष्ट्र,दि.१५(पीसीबी) – उपवास, नवस-पायी वाऱ्या करु नका; एकमेकांची काळजी घ्यावी. हेच माझ्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थनांचं काम करतील, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे केलं आहे.

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी राज्यभरातून त्यांच्या समर्थकांकडून प्रार्थना, नवस करत आहे. काहींनी तर उपवास, पायी भगवान गडावर जात आहे. “आपण सर्वांनी आहात त्या ठिकाणी राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे. एकमेकांची काळजी घ्यावी. हेच माझ्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थनांचं काम करतील,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे केले.

“मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत, काहीजण उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत; तुम्हा सर्वांचे माझ्यावरील ऋण वाढतच जात आहेत! पण सहकाऱ्यांनो, असे काहीही करु नका. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा-आशीर्वादाने मी ठणठणीत बरा होऊन येणार आहे. कोणीही पायी चालत जाणे, उपवास करणे असे काहीही करू नका. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल? आपण सर्वांनी आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे, एकमेकांची काळजी घ्यावी, हेच माझ्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचं काम करतील,” अशी पोस्ट फेसबुकद्वारे धनंजय मुंडे यांनी पोस्ट केली.

मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात…

Gepostet von Dhananjay Munde am Sonntag, 14. Juni 2020

दरम्यान, धनंजय मुंडे यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील 136 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.