रेल्वे ब्रिज जवळील लोखंडी बॅरिकेटला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
242

देहुरोड़, दि. 3 (पीसीबी): देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या रेल्वे ब्रिज जवळील लोखंडी बॅरिकेटला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय बाजीराव मांढरे (वय 27, रा. कामशेत, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार डी जे जगताप यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीस्वार अक्षय त्याच्या दुचाकीवरून 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात होता. देहूरोड येथील रेल्वे ब्रिजच्या कामाजवळ लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. अक्षय याने भरधाव वेगात दुचाकी चालवून लोखंडी बॅरिकेटला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.