दारू पिण्यास मनाई केल्याने तरुणास मारहाण

0
227

पिंपरी, दि. 3 (पीसीबी) : स्मोकिंग हाऊसमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याने चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास शिवराज नगर, रहाटणी येथे घडली.

किरण पाटील, आशिष शेट्ये, अतिश व कैलास अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शुभम भारत पवार (वय 21, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या तोंडओळखीचे आहेत. आरोपी शुक्रवारी रात्री स्मोकिंग हाऊस येथे दारू पीत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना दारू पिण्यास मनाई केली. यावरून आरोपींनी सुरुवातीस शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दगडाने, लोखंडी रॉड व लाकडी फळीने मारून फिर्यादी यांना गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.