रावेत येथील टप्पा १ पंप हाऊस मधील व्हाल्व फुटल्यामुळे पंप हाऊस मध्ये पाणी

0
281

पिंपरी, दि.७ (पीसीबी) : रावेत येथील टप्पा १ पंप हाऊस मधील व्हाल्व फुटल्यामुळे पंप हाऊस मध्ये पाणी झालेले आहे. व्हाल्व बदलण्याचे काम सूरु केले आहे . त्यामुळे अचानक पाणी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय . सर्व इलेक्ट्रिक पॅनेल मध्ये पाणी गेल्यामुळे सर्व पॅनल पूर्णपणे ड्राय केल्याशिवाय पंप चालू करता येत नाहीत . काम युद्ध पातळीवर सुरू आहे, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सह शहर अभियंता प्रविण लडकत यांनी केले आहे.

आज संपुर्ण शहरात सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. आज रात्री पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे महापालिकेने प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे.