राज्यात डिझेल चार रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा  

0
547

नाशिक , दि. ५ (पीसीबी) –  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही कमी झाले आहेत. राज्य सरकारने कर कमी केला आहे. त्यामुळे डिझेलच्या करातही कपात होऊन डिझेल चार रुपयांनी स्वस्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) केली. यामुळे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना  पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. 

स्थानिक करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलही जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार डिझेलच्या दरात आणखी चार रुपयांपर्यंत कपात करण्यास प्रयत्नशील आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

राज्यात पेट्रोल साडेचार रुपयांपर्यंत, तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तरी नागरिकांना याचा साडेचार ते चार रूपयांचा फायदा झाला आहे. लिटरमागे पूर्ण पाच रुपये कमी झालेले नाहीत.