राज्यात डिझेल चार रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा  

0
466

नाशिक , दि. ५ (प्रतिनिधी) –  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही कमी झाले आहेत. राज्य सरकारने कर कमी केला आहे. त्यामुळे डिझेलच्या करातही कपात होऊन डिझेल चार रुपयांनी स्वस्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) केली. यामुळे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना  पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.