रहाटणीतील ‘पुणेकर ज्वेलर्स’वर दरोडा टाकणाऱ्या फरारी आरोपीचा मुजफ्फरनगरमध्ये एन्काऊंटर

0
585

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – रहाटणी येथील ‘पुणेकर ज्वेलर्स’ या दुकानात गोळीबार करुन दरोडा टाकणाऱ्या फरार सराईताचा मुजफ्फरनगर येथे मेरठ पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.

रवींद्र ऊर्फ कालिया गोस्वामी (वय २८, रा. आदमपूर, जि, हिस्सार, हरियाणा) असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचे दोघे साथीदार सुभाष मोहनलाल बिशनोई (वय २४, रा. मंगाली मोहबत, ता. व जि. हिसार, रा. हरियाणा) आणि महिपाल दुधाराम जाट (वय २१, रा. बालेवाडी, पुणे) या दोघांना वाकड पोलिसांनी या आगोदरच अटक केली होती.

बुधवार (दि. ६ मार्च) दुपारच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान, वाकड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींर्यंत पोहोचले होते. आरोपींना पकडण्यासाठी वाकड पोलीस वेषांतर करून महिनाभर हरियाणात राहिले.  त्यानंतर सुभाष आणि महिपाल या दोघांना अटक करुन काही ऐवज ताब्यात घेतला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी रवींद्र हा फरार होता. मेरठ पोलिसांनी त्याचे एन्काऊंटर केला आहे. त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश आणि हरियाणामधे गंभीर गुन्हे दाखल होते.