डोंगरी दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

0
431

नवी दिल्ली, दि, १६ (पीसीबी) – मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती असून बचावकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चिंचोळी गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की, “मुंबईतील डोंगरी येथे झालेल्या दुर्घटनेचं दुख: आहे. दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी अपेक्षा. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत असून, गरजूंना मदत केली जात आहे”.