रशियात लँडिंग करताना विमान पेटले; ४१ प्रवासी ठार

0
370

मॉस्को, दि. ६ (पीसीबी) – मॉस्कोत इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी सुखोई सुपरजेट या प्रवासी विमानाला आग लागली. या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. रविवारी हा अपघात घडला. मॉस्को विमानतळावर ही घटना घडली. विमानाची १०० प्रवाशांची क्षमता आहे. या विमानात ७३ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर प्रवास करत होते. अपघातानंतर अनेक प्रवासी इमर्जन्सी स्लाइडमधून बाहेर निघण्यात यशस्वी झाले. ७३ पैकी ३७ प्रवासी जिवंत आहेत आणि ४१ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती या अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकाच्या प्रवक्ता स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली.