रशियात लँडिंग करताना विमान पेटले; ४१ प्रवासी ठार

0
515

मॉस्को, दि. ६ (पीसीबी) – मॉस्कोत इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी सुखोई सुपरजेट या प्रवासी विमानाला आग लागली. या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. रविवारी हा अपघात घडला.

मॉस्को विमानतळावर ही घटना घडली. विमानाची १०० प्रवाशांची क्षमता आहे. या विमानात ७३ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर प्रवास करत होते. अपघातानंतर अनेक प्रवासी इमर्जन्सी स्लाइडमधून बाहेर निघण्यात यशस्वी झाले. ७३ पैकी ३७ प्रवासी जिवंत आहेत आणि ४१ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती या अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकाच्या प्रवक्ता स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली.

मुरमांस्क येथे जाणाऱ्या विमानाने शेरेमेटेव्यो विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे विमानाने तातडीने विमानतळावर उतरविण्यासाठी प्रयत्न केला. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात ते उतरले. पण विमानाच गिअर हीट जमिनीवर आदळला आणि पाठोपाठ विमानाचे नाकही आदळले. त्यामुळे विमानाला आग लागली.