भोसरीतील महिलेला कॅनडातील वर्क परमीट देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांचा गंडा; आरोपी अटक

0
430

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – कॅनडातील वर्क परमीट आणि तेथे तुम्हाला कायमचे रहिवासी बनवून देतो असे सांगून एका इसमाने महिलेला तब्बल ८ लाखांचा गंडा घातला. ही घटना जानेवारी २०१९ पासून ते रविवार (दि.५) दरम्यान सेक्टर नं.७, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

साधना हरीसराय सिंग (वय ३२, रा. एच ३०१, व्दारका विश्व सोसायटी, सेक्टर नं.७, इंद्रायणीनगर, भोसरी) असे फसवणुक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जतिन नरेंद्रसिंग ठाकुर (वय ३४, रा. व्दारा अभिजीत ठाकुर बि.३०५, सिल्वरनेट सोसायटी, नरेगाव, पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप जतिन याने फिर्यादी साधना यांना, “तुम्हाला मी कॅनडातील वर्क परमीट आणि तेथील कायमचे रहिवासी पत्र काढून देतो असे सांगितले होते. यासाठी जतिन याने साधनाकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. साधनाने ती रक्कम जतिन याच्या खात्यात ट्रान्सफर केली. मात्र बरेच दिवस उलटून देखील जतिन याने साधनाला नाही कॅनडातील वर्क परमीट दिले नाही तेथील कायमचे रहिवासी पत्र. यामुळे साधनाला आपली फसवणुक झाल्याचे समजले. तिने तातडीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन जतिन याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जतिन याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरणार तपास करत आहेत.