शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ३८ जणांची फसवणूक

0
57

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले असल्याचे सांगत ३८ जणांकडून गुंतवणूक म्हणून एक कोटी १२ लाख २८ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सन २०१५ ते मी २०२४ या कालावधीत पूर्णानगर चिखली येथे घडला.

प्रशांत सीताराम खाडे, सीताराम खडे (रा. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुहास बजरंग शेजवळ (वय ५६, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या ३७ सहकाऱ्यांना ‘आम्ही तुमचे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले आहे’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून १० लाख ३८ हजार रुएए तर इतर ३७ जणांकडून एक कोटी एक लाख ९० हजार रुपये असे एकूण एक कोटी १२ लाख २८ हजार रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. सुरुवातीला फिर्यादी आणि इतर लोकांना काही दिवस परतावा मिळाला. मात्र त्यांनतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी परतावा देणे बंद केले. तसेच ३८ जणांना एलकेपी कंपनीचे खोटे प्रमाणपत्र देत फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.