रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार निलेश राणेंसह १६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल  

0
442

रत्नागिरी, दि. ११ (पीसीबी) –  शिवीगाळ  करत दहशत निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे  लोकसभा उमेदवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हातखंबा एस. एस. टी पॉईंट येथे  तयार केलेल्या चेकपोस्टवर वाहनांची  पोलिसांकडून तपासणी  सुरू होती.  यावेळी राणे यांनी शासकीय  कामात अडथळा निर्माण करत शिवीगाळ केली. या प्रकरणी  राणे यांच्यासह स्वाभिमानच्या १६ कार्यकर्त्यांवर  ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे सर्व चित्रण व्हिडीओ कॅमेरात  कैद झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी राणे यांची गाडी येथे आली असता वादावादी झाली.