आकुर्डीत वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले

0
495

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालेल्या एका ७५ वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना बुधवार (दि.१०) सकाळी साडेनऊच्या सुमारास आकुर्डी भाजी मंडई समोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी ७५ वर्षीय वृध्देने निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार सकाळी साडेनऊच्या सुमारास आकुर्डी भाजी मंडई समोरील रस्त्यावरुन ७५ वर्षीय वृध्द महिला या पायी जात होत्या. यावेळी मागून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनी सोन्याचे गंठण हिसका मारुन चोरुन नेले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.