‘…म्हणून ‘त्या’ मिल्ट्री कॅन्टीनचा दारूसाठा जप्त’: पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

0
242

पुणे, दि.०२ (पीसीबी) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून गुजरात येथे तस्करी होत असलेला मिल्ट्री कॅन्टीन मधील विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विकण्यासाठी नेणाऱ्या आरोपीला अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. मयुर सतिश उघाडे रा.लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवार दि १ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनचे पथक कामशेत परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली.

त्यांना कळलं कि, पुणे-अहमदाबाद भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स नंबर जी.जे ०३ बीटी २२५७ यामधून बॅगामध्ये अवैध विदेशी दारुसाठा विक्रीसाठी गुजरात येथे मयुर सतिश उघाडे रा.लाणीकाळभोर, ता.हवेली जि. पुणे हा घेवून जाणार आहे. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने कामशेत ता.मावळ जि.पुणे एक्सप्रेस हायवेवर बोगदयाचे जवळ सदर नंबरची ट्रॅव्हल्स आडवून मयुर उघाडे यास अवैध विदेशी दारूचा साठा एकूण किं.रूपये २४, हजार ५०८ रुपयेचे दारू ताब्यात घेऊन माल जप्त केला आहे. सदर जप्त केलेली दारू ही मिलिटरी कॅन्टीन मधून घेतली असल्याचे आढळून आलेले आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिला असून पुढील अधिक तपास कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी हे करीत आहेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.