मोदी विष्णूचे अकरावे अवतार; जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करतात- उद्धव ठाकरे

0
344

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभ्रमणात सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. अर्थात भगवान विष्णूचे ते अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागते. भारताशी अनेक देशांचे संबंध बरे नव्हते. ते दुरूस्त करण्यासाठी पंतप्रधानांना अशी जागतिक वणवण करावी लागते,’ असा टोला लगावतानाच ‘या जागतिक वणवणीवर आतापर्यंत १४ हजार कोटी रूपयांचा चुराडा झाला असून हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात भारताला काय मिळाले यावर खुली चर्चा व्हायला हवी’, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.