‘वंदे मातरम्’ ला विरोधच करणार- प्रकाश आंबेडकर

0
1025

परभणी, दि. २३ (पीसीबी) – देशात राष्ट्रगीत गायले जात असताना ‘वंदे मातरम्’ कशाला हवे, काहीतरी एकच म्हणा ना. जन गण आम्ही म्हणू, ‘वंदे मातरम्’ला विरोधच असेल, असा इशारा माजी खासदार अड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीत दिला.

वसमत रोडवरील सावली विश्रामगृहावर सोमवारी (२२ ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी या पक्षाचे किशन चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण कनवटे यांची उपस्थिती होती. पुढे आंबेडकर म्हणाले, ‘बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून दोन्ही काँग्रेस आणि भाजप हे आम्हाला हिन पातळीने संबोधत आहेत. या तिन्ही राष्ट्रीय पक्षाचे हिडीस प्रकार चालू आहेत. या हिडीस प्रवृत्तीचा आपण निषेध करत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ मुस्लिम समाजाचा मतांसाठी वापर केला. सध्या धर्म व जातीचा आधार घेऊन राजकारण केले जात आहे.’

या प्रसंगी द्वेषाचे राजकारणही केले जात आहे. सत्तास्पर्धा चांगली पण सत्तेसाठी सर्वकाही हे बरोबर नाही, असे मत व्यक्त करत अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, ‘काँग्रेस बरोबर फक्त एकवेळा बोलणी झाली आहे. काँग्रेस पक्षाचे निर्णय दिल्लीश्वराच्या हातात असल्याने येथील पक्षाध्यक्ष काहीही करू शकत नाही, याचा प्रत्यय आला आहे. काँग्रेसबरोबर गेलो तरी एमआयएम साथ सोडणार नाही, याचा पुनरोच्चार करत ही युती तुटणार नाही.’