मोदींपेक्षा १० पट जास्त काम केले; केजरीवालांचे अमित शाहंना खुल्या चर्चेचे आव्हान

0
346

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारने केलेली कामे आणि दिल्ली सरकारने केलेली कामे यांची तुलना केली आहे. मोदी सरकारपेक्षा १० पट जास्त कामं केल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या कामांबाबत खुली चर्चा करण्याचं आव्हान भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना दिलं आहे.