मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांना सर्वात मोठा धक्का देण्याची तयारी?

0
581

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते व छत्रपती घराण्यांचे वारस उदयनराजे भोसले व रामराजे निंबाळकर यांचा एकाच वेळी एकाच व्यासपिठावर भाजप प्रवेशाचा सोहळा करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आतापर्यंतचा मोठा धक्का देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उदयनराजे यांचे प्रतिस्पर्धी शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप मधे प्रवेश केल्यानंतर रामराजे व आता उदयनराजे यांनाही भाजपकडे वळवण्यात मुख्यमंत्र्याना यश प्राप्त झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे हा प्रवेश लांबल्याचे सांगण्यात येते. महापुरानंतर राष्ट्रवादीने सरकार वर जोदार टिकास्र सोडले. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी दोन्ही राजेंना एकाच व्यासपिठावर आणून राष्ट्रवादी व शरद पवार यांना जोरदार धक्का देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. .