मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा मिलिंद देवरा यांचा राजीनामा

0
398

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा काँग्रेसमध्ये नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या पदाचा राजीनामा सोपवतांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.