कासारवाडीत फॉर्च्युनर कार खरेदीच्या बहाण्याने एकाला साडेसहा लाखांचा गंडा

0
394

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – फॉर्च्युनर कार खरेदीच्या बहाण्याने एकाला चौघा जणांनी मिळून तब्बल साडेसहा लाखांचा गंडा घातला. ही घटना कासारवाडीतील केशवनगरमध्ये घडली.

याप्रकरणी महम्मद सर्फराज गौस मालदार (वय ३२, रा. कासारवाडी महादेव मंदिराजवळ, केशवनगर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महम्मद अहमद हुसेन शेख, महम्मद युसुफ हुसेन शेख, महम्मद शौकत हुसेन शेख आणि नईम (सर्व रा. जामुना गंज कॉलनी, चारमिनार, आंध्रप्रदेश) या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महम्मद गौस मालदार यांच्याकडे फॉर्च्युनर कार होती. ती त्यांना विकायची होती. यामुळे आरोपींनी ती कार घेण्यासाठी साडेआठ लाखात व्यवहार ठरवला. तसेच रोख २ लाख रुपये महम्मद गौस मालदार यांना दिले. तर उरलेली साडेसहा लाखांच्या रकमेचा चेक दिली. मात्र तो चेक बॅकेत भरला असता तो वटलाच नाही. तसेच आरोपींनी कारही नेली आणि राहिलेली साडेसहा लाखांची रक्कम परत केली नाही. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलिस तपास करत आहेत.