मुंबईत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली

0
415

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्रात भाजपविरोधात प्रचारसभांचा धडाका लावणारे मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. राज ठाकरे यांची २४ एप्रिल रोजी मुंबईतील काळाचौकी-अभ्युदयनगर येथे  सभा होणार होती. मात्र, या सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढवत  नाही, असे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारून स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यास सांगितले आहे. यावर आता राज ठाकरे कोणती भूमिका  घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या सभेसाठी मनसेने १८ एप्रिल रोजी एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजनें’तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. त्यानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता.