भाजपला बाप जन्मात यश मिळू देणार नाही – शरद पवार

0
824

सातारा, दि. २१ (पीसीबी) –  बारामतीचे काय महाराष्ट्रात इतर मतदारसंघात भाजपला बाप जन्मात यश मिळू देणार नाही, असे सांगून भाजप सरकारच्या डोक्यात सत्तेची मस्ती घुसली आहे. ती मस्ती या निवडणुकीत  उतरविणार आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर महाआघाडीचे उमेदवार उद्यनराजे भोसले यांच्या  प्रचार सभेत पवार बोलत होते.

यावेळी  शरद पवार म्हणाले की, सातारा म्हणजे कर्तुत्ववान नररत्नांची खान, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवरायांचा हा जिल्हा आहे. ब्रिटीशांना धडा शिकवणा-या क्रांतीकारकांची पत्री सरकारची ही भूमी आहे. भारत हा शेतक-यांचा देश आहे. मात्र सरकारने शेतक-यांसाठी काहीच पोषक आणि पुरक काम केले नाही. आमच्या सत्तेच्या काळात अधिक हमीभाव दिला. आणि १२० कोटी जनतेला अन्न देणा-या बळिराजाला सन्मानाने जगण्यासाठी सर्वात मोठी कर्जमाफी दिली, असे पवार म्हणाले.