मी लोकसभा लढणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण

0
672

सातारा, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी  उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेचे चव्हाण यांनी खंडन केले आहे.

चव्हाण म्हणाले की, लोकसभा लढविण्याची कोणतीही चर्चा नाही.  मी लोकसभा  लढणार नाही.  कऱ्हाड दक्षिणेतून आमदारकी लढणार  आहे. मी लोकसभा लढवणार  असल्याची  विनाकारण चर्चा सुरू झाली  आहे. मात्र, त्याचा माझ्याशी कसलाही संबंध नाही.  मी विधानसभा निवडणूक कऱ्हाड दक्षिणेतून लढणार आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम ठेवू नका.

साताऱ्यातून खासदार उदयनराजे यांच्या विरोधात माजी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची नावे  सोशल मीडियातून चर्चेत आली.  या  चर्चा  पृथ्वीराज चव्हाण यांनी  फेटाळून लावल्या आहेत.