मीही अयोध्येला जाणार आहे – रामदास आठवले

0
1117

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे मी स्वागत करतो. मी ही अयोध्येलाही जाणार आहे. तेथे राम मंदिर, मशिदीसाठी आणि बुद्ध मंदिरासाठी जागा देण्याची मागणी करणार आहे, असे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) येथे सांगितले.   

अयोध्यात राम मंदिर व्हावे, असे माझेही मत  आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राममंदिराच्या विरोधात नसेल. तर हिंदु- मुस्लिमांना न्याय देणारा असावा, असे सांगून ती जागा मूळ  बुद्ध मंदिराची होती त्यामुळे तेथे बुद्ध मंदिरालाही जागा देण्यात यावी,  असेही ते यावेळी म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर बांधताना मुस्लिमांची,  मशीद बांधताना हिंदुची मदत झाली आहे. त्यामुळे राम मंदिर बेकायदेशीर होता कामा नये.  देशामध्ये बुद्ध मंदिरे, गुरूद्वारा, मंदिरे आहेत. मी अयोध्येला जाणार आहे. तेथील हिंदु साधू आणि मुस्लिम मौलांबरोबरही चर्चा करणार आहे. अयोध्येत बुद्धाचे अवषेश मिळाले आहेत. वादग्रस्त जागेवर आमची मागणी नसून राष्टीय एकात्मता नांदण्यासाठीच आम्ही  प्रयत्न  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.