मानमध्ये दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी पळवले ३ लाखांचे दागिने

461

मान, दि. १६ (पीसीबी) – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे एकूण ३ लाख १० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.१५) पहाटे पाचच्या सुमारास माण राक्षेवस्तीतील घरातून समोर आली.

याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या माण येथील राक्षेवस्तीत राहतात. गुरुवारी त्या त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे एकूण ३ लाख १० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.