माढ्यातून संजय शिंदेंना राष्ट्रवादीची उमेदवारी; शरद पवारांची घोषणा  

0
739

बारामती, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पवार यांनी शिंदे यांची माढा लोकसभा मतदारसंघातून तर उस्मानाबादमधून  राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी  देण्यात आल्याचे  घोषीत केले.

यावेळी पवार म्हणाले की,  संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे का म्हणायचे? ते घरातलेच आहेत, असे  पवार यांनी म्हणाले.  राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करत आहे, असे पवार यांनी जाहीर केले.

दरम्यान, माढा येथील लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर  येथून कोणाला    उमेदवारी  दिली जाणार? याकडे  सर्वांचे लक्ष लागले होते.  अखेर राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना  उमेदवारी जाहीर केली आहे.