मुले मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का? ; खासदार उद्यनराजेंची जीभ घसरली

0
787

सातारा, दि. २२ (पीसीबी) – मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र,  ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण मुले मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का? ,  असा प्रतिप्रश्न  खासदार उदयनराजे यांनी तक्रारदार विद्यार्थिनीला केला. यावर उपस्थित आवाक् झाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उदयनराजे यांनी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थांशी संवाद साधला.  यावेळी एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंची जीभ घसरली. ‘मुले मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार का?’ असा प्रतिप्रश्न करत उदयनराजेंनी उपस्थितांना अवघडून टाकले.

एका विद्यार्थिनीने  मुले छेड काढतात, अशी तक्रार केली.  मुले पाठलाग करतात, मागे येऊन ओव्हरटेक करतात, मुली स्टँडवर थांबल्या, की गाडी लावून त्यांच्याजवळ उभे राहतात, त्यांना सारखे बघतात’ अशी तक्रार केली.  मात्र, यावर उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच आवाक् झाले.

यानंतर उद्यनराजे यांनी सावरत आपल्या विधानावर खुलासा करताना म्हटले की, माझ्या म्हणण्याचा  अर्थ असा नाही की, कोणत्याही प्रकारची विकृती त्यांच्यात असली पाहिजे. ती विकृती जर असली तर आपण मला येऊन  सांगा. जातीने त्याच्यात लक्ष घालू, संबंधित व्यक्तीला समजून सांगण्याचे काम करु.