माझे कुटुंब माझ्याविरोधात कट आखत आहे – तेज प्रताप यादव

0
1501

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – अर्ज दाखल केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याने आपल्याच कुटुंबाविरोधात बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या नात्यात दुरावा येण्यामागे आपले कुटुंब जबाबदार असल्याचे तेज प्रताप यादव याचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

‘कुटुंबातील प्रत्येक जण ऐश्वर्याला पाठिंबा देत आहे. मी गेल्या दिड महिन्यांपासून तिच्या संपर्कात नव्हतो. पण अचानक ती पुन्हा घरी आली असून माझ्या कुटुंबीयांकडून तिला समर्थन मिळत आहे. या सगळ्यामागे मोठा कट आहे, आणि माझे कुटुंबीय त्यात सहभागी आहेत’, असे तेज प्रताप यादवने म्हटले आहे.