चिंचवड येथील बळवंतनगरमध्ये चौघांवर धारदार हत्याराने वार

0
2401

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघा जणांवर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना रविवारी (दि.४) सायंकाळी पावनेपाचच्या सुमारास चिंचवड बळवंतनगर येथील राम कॉलनीमध्ये घडली.

सोमनाथ चंद्रकांत माने (वय २१, रा. साईसमर्थ कॉलनी, बळवंतनगर, चिंचवड), अबरार उर्फ चुन्नु शब्बीर अहमद, गौरव सातपुते आणि रवि मासाळकर असे धारदार शस्त्राचे वार होऊन जखमी झालेल्या इसमांची नावे आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, गणेश खांगटे, साहील कुंभार, राकेश गंगावणे आणि योगेश गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावनेपाचच्या सुमारास चिंचवड बळवंतनगर येथील राम कॉलनीमध्ये लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी गणेश खांगटे, साहील कुंभार, राकेश गंगावणे आणि योगेश गायकवाड यांनी मिळून सोमनाथ, अबरार, गौरव आणि रवि या चौघांवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाले. याप्रकरणी चारही आरोपींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.