थेरगाव मधून५ वर्षीय मुलाचे अपहरण

0
1707

थेरगाव, दि.५ (पीसीबी) – घराच्या पार्किंगमध्ये मित्रासोबत खेळत असताना, रविवारी (दि.४) दुपारी २ ते ३ यावेळेत एका अज्ञात इसमाने मुलाला गाडीवर बसवून नेले आहे. ही घटना थेरगाव येथील कुणाल रेसिडेन्सि सोसायटी बिल्डींग नं. ७ येथे घडली.

सुफियान नासिर खान (वय ५) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २ ते ३ यावेळेत सुफियान त्याच्या मित्रासोबत घराच्या पार्किंगमध्ये खेळत होता. यावेळी दुचाकी वरुन आलेल्या एका इसमाने, ‘सुफियान गाडी पे बैठ’ असे म्हणुन त्याला घेऊन गेला. तो अद्याप कोठेच आढळलेला नाही. संबंधित मुलाबाबत कोणालाही कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी वाकड पोलिसांचा संपर्क क्रमांक ०२०२७२६११२०, मोबा. नं. ७०२०९९३६८४ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.