महानगरपालिकेच्या वतीने जागतिक सायकल दिन साजरा..

0
185

पिंपरी, दि. ४ जून २०२३ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक सायकल दिन साजरा करणेसाठी मनपातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी सायकल फेरी काल सकाळी ७.०० वाजता आयोजित केली होती.

जगभरातील अनेक शहरामधील नागरिक दैनदिन प्रवास, वॉकिंग, सायकलीचा व सार्वजनिक वाहतूक यांचा वापर करून आपली शहरातील प्रवासाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच धर्तीवर केंद्र शासनाने वॉकिंग, रनींग व सायकलिंग चा वापर वाढविणे आवश्यक असल्याने देशातील विविध शहरांमध्ये सायकलिंग, सार्वजनिक वाहतूकीचा वापर होणेकामी फ्रिडम टु रन, सायकल कॅम्पेन फाॅर सिटी लिडर्स हा उपक्रम सुरू केलेला आहे.

आजचा जागतिक सायकल दिवशी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी ही चालणे व सायकलिंगचा वापर करावा याकरीता मनपा भवन ते नाशिक फाटा ते पुन्हा मनपा भवन अशी सायकल फेरी आयोजित केली होती. सदर सायकल फेरी मध्ये काही अधिकारी, कर्मचारी आपल्या घरापासून मनपा पर्यंत स्वतःची सायकल घेवून सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते. मनपाच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत याठिकाणी ज्यांच्याकडे सायकल नाही अशा अधिकारी,कर्मचारी यांना सायकली महापालिका भवन येथे उपलब्ध करून दिल्या होत्या.

सदर सायकल फेरीमध्ये स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, नितीन देशमुख, माणिक चव्हाण तसेच विविध विभागाचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता सुरक्षा कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेवून सायकल फेरी यशस्वीपणे व सुरक्षित पूर्ण केली.उप अभियंता संतोष कुदळे व सुनील पवार यांनी या सायकल फेरीचे नियोजन तसेच सुरक्षितपणे सायकल फेरी पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.