मला स्वत:ला ८ वर्षे टीबी झाल्याचे माहिती नव्हते – अमिताभ बच्चन

0
653

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मला स्वत:ला ८ वर्षे टीबी झाल्याचे माहिती नव्हते, अशी माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्यासह संवाद साधताना अमिताभ यांनी हा खुलासा केला.

‘टीबी जागरुकतेचा संदेश देताना मी नेहमी स्वत:चे उदाहरण देतो आणि तुमच्यामध्ये याबाबत जागरुकता निर्माण होईल अशी आशा करतो. मला स्वत:ला टीबी आणि हेपेटाइटिस्ट-बी झाल्याचे सर्वांसमोर सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही. टीबीमूळे माझ्या यकृताचा ७५% भाग खराब झाला आहे. मागील २० वर्षात माझ्या यकृताचा केवळ २५% भाग काम करत असतानाही मी ठणठणीत आहे’ असे अमिताभ म्हणाले.

‘प्रत्येक आजारावर उपाय असतो, टीबी हा आजार कोणालाही होऊ शकतो. जर तुम्ही टीबी तपासणी कली नाही तर तुम्हाला आजारबद्दल कळणार नाही आणि त्यावर तुम्ही योग्य उपचार घेऊ शकणार नाही’ असेही अमिताभ यावेळी म्हणाले.