गिरीश महाजनांवर धनंजय मुंडेंची एकेरी भाषेत टीका म्हणाले…

0
565

जालना, दि. २० (पीसीबी) –  महापुरात होडीत बसून सेल्फी काढणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  यांना जोड्याने हाणले पाहीजे, अशी एकेरी भाषेत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी मुंडेंनी महाजन यांच्यासोबतच कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला. महापुरावेळी सदाभाऊ खोत यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ वरुन महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.  मड्यावरील लोणी खाणारी ही लोकं  आहेत, असे मुंडे  म्हणाले .

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले असताना गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओला हसून दाद देतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गिरीश महाजन यांच्या त्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.